गाडगेबाबांची स्वच्छतेची शिकवण प्रत्येकाने आचरणात आणावी – चंद्रकांत गोखले

*⚡मालवण ता.२२-:* संत गाडगेबाबांनी लोकांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा नष्ट होण्यासाठी त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना जागृत करण्याचे काम केले. संत गाडेबाबांनी दिलेली स्वच्छतेची शिकवण प्रत्येकाने आचरणात आणावी, असे आवाहन प्रा. चंद्रकांत गोखले यांनी आडवण येथे संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात केले. संत गाडगे महाराज परीट सेवा संघातर्फे मालवण शहरातील आडवण येथे श्री संत गाडगे महाराज यांचा पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महेश जुवाटकर, नगरसेविका पूजा करलकर, संत गाडगे महाराज सेवा संघाचे अध्यक्ष मोहन वालकर, उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, खजिनदार आप्पा परुळेकर, सचिव विनायक चव्हाण, दीपक चव्हाण, विजय नेमळेकर, दाजी कोळंबकर, किरण चव्हाण, हेमंत वालकर, सत्यवान चव्हाण, उत्तम चव्हाण, अनिल चव्हाण, सुशांत चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी प्रा. गोखले यांच्यासह दीपक चव्हाण, संग्राम कासले यांनी मनोगत व्यक्त केले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. ग्रा. पं. सदस्या आदिती परुळेकर यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. शशिकांत चव्हाण यांनी संत गाडगेबाबा यांची व्यक्तिरेखा साकारली होती. सूत्रसंचालन सुरेश चव्हाण यांनी केले.

You cannot copy content of this page