*⚡कणकवली ता.२२-:* कणकवली प्रांत कार्यालयासमोरील उड्डाण पुलाखाली असलेल्या मनोरुणाला सविताश्रम पणदूर यांनी त्याच्यावर उपचार करत त्याला सविताआश्रमात आधार दिला आहे. यासाठी कणकवली सहयोगिनी सेवा मंडळ यांनी जागृकता दाखवत सविता आश्रमच्या संदीप परब यांना फोन करून त्या मनोरुग्ण संदर्भात माहिती दिली त्यावेळी 21 डिसेंबर रोजी रात्री कणकवली येथे तो बेवारस मनोरुग्ण प्रांत कार्यालयासमोरील उड्डाणपुलाखाली फिरत असल्याचे त्या रुग्णाला डंपर व्यवसायिकांनी पाहिले असता सहयोगिनी सेवा मंडळाच्या माध्यमातून सविता आश्रम यांना कळविण्यात आले.
यावेळी संदीप परब यांनी कणकवलीत दाखल होत त्या मनोरुग्णांच्या हातांच्या विविध बोटांमध्ये रबर घातलेले पाहिले. त्यापैकी ऊजव्या हाताच्या मधल्या बोटातील रबर डबल फिरवल्याने मोठी जखम होऊन चिघळली. ती साफ केली त्यातुन जीव झाले ते साफ केले आणि दाढी केली .केस कापले. व पोलीसांच्या मदतीने संविताआश्रम पणदुर येथे रात्री ११:३० वाजता दाखल केले. यावेळी सहयोगिनी सेवा मंडळाच्या अध्यक्ष दीपा सरुडकर,शुभागी उबाळे ,संदीप परब, विजय नाईक,प्रसाद आंगणे , उदय कामत व डंपर व्यवसायिक सुशील दळवी, रहित रंजीवडेकर, दिलीप सरूडकर, बाळू धोत्रे, महेश मेस्त्री, साळवी उपस्थित होते.
