कोळोशी ग्रा. प.पोटनिवडणूक बिनविरोध

सदस्या गिता पावसकर यांचे आम.नितेश राणे यांनी केले अभिनंदन

*⚡कणकवली ता.२२-:* कणकवली तालुक्यातील काही ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूक लागल्या होत्या .या अनुषंगाने कोळोशी ग्रामपंचायत प्रभाग 2 सर्वसाधारण सदस्या असलेल्या सानवी चव्हाण यांनी नोकरी निमित्त राजीनामा दिल्यानंतर सदर जागा रिक्त झाली होती .यात सौ.गिता महादेव पावसकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्या बिनविरोध निवड झाली असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

सदर नवनिर्वाचित सदस्या सौ. पावसकर या भाजपा पुरस्कृत असल्याने आम.नितेश राणे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली,तालूकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री,तालूका सरचिटणीस व असलदे सरपंच पंढरी वायंगणकर ,कोळोशी सरपंच सौ.रितीका सावंत,माजी सरपंच सुशिल इंदप, विश्वनाथ कदम आदी उपस्थित होते. त्यांच्या बिनविरोध निवड झाली असल्याने कोळोशी गावातून अभिनंदन केले जात आहे.

You cannot copy content of this page