महेंद्र सांगेलकर;सांगेलीत काँग्रेस पुरस्कृत महाविकास आघाडीचे श्रीधर लाड विजयी
सावंतवाडी : सांगेली ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेस पुरस्कृत महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीधर लाड यांनी विजय प्राप्त केला. कॉंग्रेसच्या करिष्म्यामुळे हे यश प्राप्त झाले असून भविष्यातील निवडणुकांतील ही नांदी आहे. आगामी निवडणुकात महाविकास आघाडीचाच झंझावात जिल्ह्यात दिसेल, असा विश्वास काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी व्यक्त केला.
तालुक्यात झालेल्या चार ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांचा निकाल जाहीर झाला. सांगेली ग्रामपंचायतीत विजयी उमेदवार श्रीधर लाड यांना २२५ तर विरोधी अशोक मेस्त्री यांना १४८ मते पडली. महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होताच कार्यकर्त्यांनी तहसीलदार कार्यालय बाहेर जल्लोष साजरा केला. यावेळी महाविकास आघाडीला जनतेन स्वीकारल आहे. सांगेलीतल्या जनतेनं हे दाखवून दिले आहे असा विश्वास महेंद्र सांगेलकर यांनी व्यक्त केला.
या जागेवरील सदस्यांच निधन झाल्यान याठिकाणी आम्ही लढणार नव्हतो. मात्र, विरोधकांकडून घाणेरडं राजकारण केलं गेलं. त्यामुळे आम्ही लढलो. आम्हाला विजयी करत जनतेनं विरोधकांना घरी बसवल आहे. जिल्ह्यातील इतर निवडणुकांतील हि नांदी असून भविष्यात महाविकास आघाडीच झंझावात जिल्ह्यात दिसेल असा विश्वास सांगेलकर यांनी व्यक्त केला. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते पंढरी गुणाजी राऊळ, शिवसेना विभागप्रमुख पुरूषोत्तम राऊळ, शिवसेना तालुका सरचिटणीस रुपेश आईर, सांगेली सरपंच सुवर्णा राऊळ, कॉंग्रेस विभागीय अध्यक्ष अँड. गुरूनाथ आईर, बबन सांगेलकर, दीपक सांगेलकर, सावंतवाडी शहराध्यक्ष अँड. राघवेंद्र नार्वेकर आदी शेकडे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. सावंतवाडी तालुक्यातील बांदा, निरवडे, देवसू-दाणोली, सांगेली या चार ग्रामपंचायतींसाठी झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया आज पार पडली. यात बांदा ग्रामपंचायतीवर भाजप पुरस्कृत राजाराम उर्फ बाळू सावंत, देवसू-दाणोलीत किसन सावंत, निरवडे ग्रामपंचायतवर हरी वारंग यांनी विजय मिळवला. याची मतमोजणी प्रक्रिया सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात पार पडली. बांदा ग्रामपंचायतीत विजयी राजाराम सावंत यांना ३३२ तर विरोधी समीर पेळपकर यांना १२३ मते पडली. निरवडे ग्रामपंचायतीत विजयी उमेदवार हरी वारंग ३६४ तर विरोधी दत्ताराम गावडे यांना २१२ मते पडली. देवसू-दाणोली ग्रामपंचायतीत विजयी उमेदवार किसन सावंत यांना १३३ तर विरोधी धोंडी जंगले यांना २२ मते पडली.
