बूर्डी पुल ते बेळगाव रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ…

शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांच्या हस्ते नारळ वाढवून भूमिपूजन…

*⚡सावंतवाडी ता.२१-:* सावंतवाडी तालुक्यातील कारीवडे पेडवेवाडी येथील बूर्डी पुल ते बेळगाव ला जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचे आज शिवसेना तालुकाप्रमुख तथा पंचायत समिती सदस्य रुपेश राऊळ यांच्या हस्ते नारळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले.

या रस्त्यासाठी आमदार दीपक केसरकर यांनी आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत 2021-22 मध्ये निधी दिला आहे.यावेळी आशोक दळवी,सुरेश भोकटे, अशोक पवार,पंकज तुळसुळकर,प्रसाद मुजं,संदीप माळकर,बाळू माळकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page