देवगडमध्ये अबिद नाईक यांचा प्रचाराचा झंझावात

देवगड : नगरपंचायत निवडणूकीच्या प्रचाराचा झंझावात सुरु झाला असून यात राष्ट्रवादी काँग्रेसनेही आघाडी घेतली आहे. देवगड नगरपंचायतीसाठी राष्ट्रवादी नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांनी शनिवारी वार्ड क्र. १० मधील किरण कांबळी व वार्ड क्र. १३ मधील मिताली सावंत यांच्या प्रभागात प्रचार दौरा करून राष्ट्रवादी व शिवसेना आघाडीच्या उमेदवाराना निवडून देण्याचे आवाहन केले.

या प्रचारफेरीमध्ये राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते नंदूशेठ घाटे, कणकवली विधानसभा अध्यक्ष डॉ अभिनंदन मालंडकर, कणकवली तालुका अध्यक्ष राजेंद्र पावसकर, देवगड राष्ट्रवादी शहर अध्यक्ष बंटी कदम, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सुंदर पारकर, तालुका अध्यक्ष प्रकाश गुरव, राष्ट्रवादी प्रांतिक सदस्य सावळाराम अनावकर, गणेश चौगुले, माजी ग्राहक संरक्षण जिल्हा अध्यक्ष दिलीप वर्णे, विशाल ठाणेकर, जिल्हा उपाध्यक्ष दिवाकर परब, तालुका सरचिटनिस शरद शिंदे, तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत पालेकर, आप्पा मांजरेकर, दया मुनगेकर, पद्माकर राउत, शिवाराम निकम, अमित गोलवकर, बाबू वाडेकर, गुरु वाड़ेकर, उपस्थित होते

You cannot copy content of this page