परिवहन सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू कासकर यांची माहिती;जनतेनेही सहभागी होण्याचे केले आवाहन
सावंतवाडी ता.१६– : संपूर्ण राज्यभर सुरु असलेल्या एसटी कामगारांच्या संपाला महाविकास आघाडी सरकारकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाही. सरकारला जाग येण्यासाठी माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर आणि राज्य परिवहन कामगार सेना यांच्यावतीने उद्या १७ रोजी रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्चात मनसे सहभाग घेणार आहे. सर्वसामान्य जनतेनेही या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन परिवहन सेनेचे जिल्हाध्यक्ष अँड. राजू कासकर यांनी केले आहे.
संपूर्ण राज्यभर चाललेल्या ह्या संपाला महविकास आघाडी सरकारतर्फे कुठलाही प्रतिसाद मिळत नाही. ह्यातून सरकारला जाग येईल ही अपेक्षा आहे. महाविकास आघाडी सरकार आणि त्यांच्या संघटना ह्या अजूनही ह्या प्रश्नांना न्याय देऊ शकत नाही हे दुर्दैव आहे. मंगेश तळवणेकर, राज्य परिवहन कामगार सेना यांनी ह्या मोर्चाचे आयोजन केले आहे. तिन्ही पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन केलेल्या महाविकास आघाडीला पुरोगामी आणि प्रगतशील महाराष्ट्रात एसटीचा सुरू संप होऊन एक महिना लोटून गेला तरीही या त्रिकूटाला संप मोडून जनतेला, कामगारांना दिलासा देता आला नाही. ह्या प्रश्नाला फक्त आणि फक्त मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे न्याय देऊ शकतील. मोर्चा सावंतवाडी बस स्थानक येथून सकाळी साडेदहा वाजता निघणार आहे, असे कासकर यांनी म्हटले आहे.
