*⚡मालवण ता.१६-:* मातोश्री राखी ताई पाटकर स्पोर्ट्स ऍकॅडमी या संस्थेच्या वतीने प्रथमच सिंधुदुर्ग खो- खो प्रीमियर लीगचे आयोजन मालवण वायरी येथील रेकोबा हायस्कुल येथे दि. १४, १५ व १६ जानेवारी २०२२ या कालावधीत करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघास रु. ११,०२२ आणि चषक तर उपविजेत्या संघास रु. ६,०२२ आणि चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तर उत्कृष्ट आक्रमक, उत्कृष्ट संरक्षक, अष्टपैलू खेळाडू, युवा खेळाडू आदी पारितोषिके देण्यात येणार आहेत. इच्छुक खेळाडूंनी आपले प्रवेश दि. ३१ डिसेंबर पर्यंत निश्चित करावेत. अधिक माहितीसाठी ९९७५९८७५३० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन राखी स्पोर्ट्स क्लबचे सचिव ताराचंद पाटकर यांनी केले आहे.
मालवणात सिंधुदुर्ग खो-खो प्रीमियर लीगचे आयोजन
