रामभाऊ परुळेकर महाविद्यालयात मानवी हक्क दिन साजरा

*⚡मालवण ता.१५-:* मालवण येथील रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालय येथे मालवण विधी सेवा समिती मार्फत आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ॲड. गावकर, ॲड. सुदर्शन गिरसागर यांनी मानवी हक्क व अधिकार यावर मार्गदर्शन केले.

यावेळी महाविद्याल्याच्या प्राचार्या डॉ. उज्वला सामंत यांनीही विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अन्वेषा कदम यांनी केले. तर आभार प्रा.मिलन सामंत यांनी मानले. या कार्यक्रमाला मालवण विधी समितीचे सहकारी श्री. कांबळी, श्री. पवार तसेच महाविद्यालयाचे प्रा. हसन खान, प्रा बर्वे, प्रा. धमापूरकर आदी उपस्थित होत्या.

You cannot copy content of this page