बंदोबस्त करण्याची वाहनचालकांसह नागरिकांची मागणी
*⚡कणकवली ता.११-:* कणकवली शहरातील सर्व्हिस रोडसह शहरातील अंतर्गत रस्त्यांवर मोकाट गुरे ठिय्या मांडून बसतात, तर काही जनावरांचा मुक्तपणे संचार सुरु आहे. त्यामुळे रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो. रस्त्यावर अचानकपणे गुरे ओलांडत असल्याने अपघात होण्याचे प्रकार वाढले असून मोकाट गुरांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी वाहनचालकांमधून होत आहे. कणकवली शहरातील अंतर्गत रस्त्यांवर मोकाट जनावरांचा सुळसुळाट सुरु आहे. मोकाट गाई, गुरे आणि कुत्री यांचा रस्त्यावर मुक्तपणे वावर असतो. त्याचा त्रास नागरिक आणि वाहन चालकांना सहन करावा लागतो. उड्डाणपुलाखालील जागेत बसणार्या फळ, भाजी विक्रेत्यांंना ही गुरे फळे, भाजी फस्त करीत असल्याने विक्रेते त्रस्त झाले आहेत.
