बॅ. खर्डेकर महाविद्यालया मार्फत सागरेश्वर किनाऱ्याची स्वच्छता

एन.सी.सी आणि एन. एस. एस विभागामार्फत पुनित सागर अभियानाअंतर्गत राबवला उपक्रम…

वेंगुर्ला प्रतिनिधी– एन.सी.सी., व एन.एस.एस. विभाग बॅ. खर्डेकर महाविद्यालय यांच्यावतीने पुनीत सागर अभियानांतर्गत सागरेश्वर किना-याची स्वछता करण्यात आली.

यात एन.सी.सी.,चे ३४ कॅडेटस व एन.एस.एस.च्या १५ स्वयं सेवकांनी सहभाग घेऊन सागरी किना-यावर जमा झालेले प्लास्टिक, बॉटल्स व इतर कचरा उचलून स्वछता केली. या स्वच्छता कार्यक्रमाचे नियोजन एन. सी.सी ऑफिसर लेफ्टनंट डॉ.बी.जी.गायकवाड, एन.एस.प्रोग्राम ऑफिसर्स प्रा.एस.जी.चुकेवाड, प्रा.व्ही.पी.नांदगीरिकर आणि प्रा.व्ही.एस.चव्हाण यांनी केले होते.

You cannot copy content of this page