*⚡मालवण ता.०८-:* मालवण तालुका सहकारी खरेदी-विक्री संघातील किमान वेतन प्रश्नी लढ्यामध्ये सहभागी झालेल्या कामगारांना सुनिल मलये, अमित गावडे आणि सहकाऱ्यांनी स्वखर्चाने स्वतःच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर कामगार न्यायालय तसेच मुंबई उच्च न्यायालय याठिकाणी दावा लढवून किमान वेतन प्रमाणे पगार मिळवून दिल्याप्रकरणी मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघ कर्मचाऱ्यांच्या वतीने सुनिल मलये व अमित गावडे यांचा पुष्पगुच्छ शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार केला. यावेळी न्याय मिळालेल्या कर्मचाऱ्यांनी पेढे वाटुन आनंद साजरा केला. सामाजिक कार्यकर्ते सुनिल मलये यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मंगळवारी हा सत्कार समारंभ सुनिल मलये यांच्या निवास्थानी संपन्न झाला. मालवण तालुका खरेदी-विक्री संघाचे किमानवेतन प्रश्नी न्यायालयीन लढाईमध्ये समाविष्ट न झालेले कर्मचारी व्यवस्थापनाच्या दमदाटीपोटी तेव्हा सहभागी झालेले नव्हते आता यापुढे मालवण तालुका खरेदी विक्री संघाच्या सर्व कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळवून देऊ असे सुनिल मलये आणि अमित गावडे यांनी कार्यक्रमस्थळी सांगितले तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतरही मोठ्या सहकारी संस्था तालुका खरेदी विक्री संघ आहेत यांनीही आपल्या कर्मचाऱ्यांच्या भवितव्याचा विचार करून शासनाच्या कायद्याप्रमाणे लवकरात लवकर किमान वेतन चालू करावे अशी त्यांनी विनंती केली तसं न केल्यास किमान वेतनप्रश्नी संपूर्ण जिल्ह्यातील सहकारी संस्था कर्मचाऱ्यांना एकत्र करुन एक मोठी चळवळ राबवून किमान वेतन मिळवून देऊ असे सांगितले.
यावेळी विजय पेडणेकर, विशाल ढोलम, दत्ता टक्के, दत्ताराम चव्हाण, योगेश जाधव, बुलाजी चव्हाण, शैलेश चव्हाण, कौशिक पेडणेकर, आबा ढोलम, राजन भोजने, निलेश चव्हाण, बाबु लुडबे, राजू जाधव उपस्थित होते.
