मोती तलावात उमलणारी कमळे म्हणजे वाढत्या घाणीचे उदाहरण!

संतोष जोईल यांचा संजू परब यांना टोला;आश्वासनांचे काय झाले ते जाहीर करण्याचे आवाहन

सावंतवाडी : कमळे कुठे उगवतात हे आम्हाला चांगलेच ठावूक आहे. त्याचे धडे आम्हाला कुणी देऊ नयेत. पण स्वच्छ, सुंदर मोती तलावात उमलणारी कमळे ही तलावातील वाढत्या घाणीच्या साम्राज्याचे उदाहरण आहे. त्यामुळे कमळे कुठे उगवतात हे सांगण्यापेक्षा तलावात घाणीचे साम्राज्य कसे निर्माण झाले? याचा अभ्यास टिकाकारांनी करावा. ३६५ दिवसांचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांची ७२० दिवसांचे नगराध्यक्ष संजू परब यांना दखल घ्यावी लागली हेच राष्ट्रवादीचे यश आहे, असा सणसणीत टोला राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष संतोष जोईल यांनी नगराध्यक्ष संजू परब यांना लगावला आहे.

जाईल यांनी पुढे म्हटले आहे की, दळवी हे राजकारणात नवीन असले तरी गेली १५ वर्ष ते समाजात कार्यरत आहेत.आगामी निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच दोन वर्षांतील अपयश घेऊन सामोरे जाणार असल्याच पुंडलिक दळवी यांनी सांगितल्याने सत्ताधारी भाजपच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. त्यामुळेच आज पत्रकार परिषद घेत २ वर्षांत काय दिवे लावले ते सांगण्याची वेळ नगराध्यक्षांवर आली असून हेच सत्ताधाऱ्यांचे अपयश आहे. विकासकामे आम्हीच केली असं सांगणाऱ्या भाजपने ही सर्व कामे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या कारकिर्दीत मंजूर होती याचीही नोंद घ्यावी.

शहरात होणाऱ्या कंटेनर थिएटरसह पोटनिवडणुकीत दिलेल्या आश्वासनांच काय झालं ? हे देखील त्यांनी जनतेसमोर जाहिर करावे. नव्या घोषणा करण्याआधी जुन्या आश्वासनांच काय झालं याचही आत्मपरीक्षण करावे, असा सल्लाही राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष संतोष जोईल यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page