मालवण पंचायत समितीचा क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सव

*⚡मालवण ता.०८-:* मालवण पंचायत समिती मधील पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांना रोजच्या कामाच्या व्यापातून विरंगुळा मिळावा, ताण कमी व्हावा आणि खेळीमेळीचे वातावरण टिकून राहावे या दृष्टीने मालवण पंचायत समितीच्यावतीने पंचायत समिती पदाधिकारी व कर्मचारी यांचा तीन दिवसांच्या क्रीडा व सांस्कृतिक, कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून उद्या गुरुवार दि. ९ डिसेंबर ते ११ डिसेंबर या कालावधीत हा महोत्सव होत असल्याची माहिती मालवणचे सभापती अजिंक्य पाताडे व उपसभापती राजू परुळेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. मालवण पंचायत समिती येथे आयोजित पत्रकार झाली. यावेळी सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजु परुळेकर उपस्थित होते. या महोत्सवात दि. ९ डिसेंबर रोजी मालवण येथील टोपीवाला बोर्डिंग ग्राउंड येथे क्रीडा महोत्सव होणार असून यात पदाधिकारी अधिकारी, कर्मचारी यांच्या विविध मैदानी व इनडोअर खेळांच्या स्पर्धा होणार आहेत. तर सुरुवाती पं. स. पदाधिकारी- कर्मचारी विरुद्ध मालवण पत्रकार यांच्यात प्रदर्शनीय क्रिकेट सामना होणार आहे, असे सभापती पाताडे यांनी सांगितले. तर दि. ११ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता मामा वरेरकर नाट्यगृह येथे सांस्कृतिक स्नेहसंमेलन होणार आहे. त्याचे उद्घाटन जि. प. अध्यक्षा सौ. संजना सावंत यांच्या हस्ते व जि. प. सभापती, सदस्य, पं. स. सदस्य यांच्या उपस्थितीत होणार आहे. या स्नेहसंमेलनात विविध केडर मधील अधिकारी कर्मचारी यांना आदर्श पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. तर जिल्ह्यात उल्लेखनीय काम केल्याबद्दल मालवण तालुका पत्रकार संघाला विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. कोरोना विषयक सर्व नियम पाळून हा महोत्सव संपन्न होणार आहे, अशी माहिती अजिंक्य पाताडे यांनी दिली.

You cannot copy content of this page