नारळ काढताना शॉक लागून एकाचा मृत्यू

*⚡वेंगुर्ला ता.०८-:* वेंगुर्ला-कॅम्प, वडखोल येथील प्रकाश रामा पालयेकर (६०) हे आपल्या घरालगत ट्रान्सफार्मर व डिपीनजिक असलेल्या नारळाच्या झाडावर (माड) नारळ काढण्यासाठी चढले असता माडाचे झावळ त्या खाली असलेल्या विद्युत तारेला लागल्याने झावळाने पेट घेतला. त्याद्वारे विजेचा शॉक लागून प्रकाश पालयेकर माडावरुन खाली कोसळले. त्यात त्यांचे जागीच निधन झाले.

वेंगुर्ला कॅम्प वडखोल येथील प्रकाश रामा पालयेकर हे आज सकाळी ८.४५च्या सुमारास आपल्या घरालगतच्या माडाच्या झाडावरील नारळ काढण्यासाठी चढले होते. त्यांच्यासोबत खाली त्यांचा पुतण्या राजेंद्र रविद्र पालयेकर हा उपस्थित होता. काही वेळातच माडाचे झावळ त्या खालून गेलेल्या ११ केव्ही तारेवर लागल्याने झावळाने पेट घेतला. त्यावेळी त्यांना शॉक लागून खाली पडले व बेशुद्ध झाले. राजेंद्र पालयेकर यांनी ओरडून आपल्या काकीला म्हणले प्रकाश यांच्या पत्नीला बोलावून घेतले. त्यांच्यावर पाणी मारुन शुद्धीवर आणण्याचा प्रयत्नही करण्यात आला. मात्र, ते शुद्धीवर येत नसल्याने गावातील एका रिक्षेने त्यांना वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारापूर्वी ते मृत झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्टकेले. त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा व ३ अविवाहीत मुली असा परिवार आहे. याप्रकरणी वेंगुर्ला पोलिसात राजेंद्र पालयेकर याने खबर दिली असून पोलिस पंचनामा करुन अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page