*⚡बांदा ता०८-:* न्यू इंग्लिश स्कूल मडुरा परिसरात रस्त्यालगत अज्ञातांकडून जेवणात वापरलेले डिश, ग्रास वगैरे साहित्य फेकण्यात आले आहे. बांदा-शिरोडा मार्गाच्या बाजूलाच व हायस्कूल जवळ सदर कचरा असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित विभागाने याची दखल घेत कचरा हटविण्याची व कायमस्वरूपी उपाययोजना करत कचरा फेकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मडुरा येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश वालावलकर यांनी केली आहे. कोरोना पाठोपाठ ओमायक्रॉन सारखे महाभयंकर रोग येत असल्याने त्यात असे प्रकार घडल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सार्वजनिक ठिकाणी अज्ञातांकडून अशाप्रकारे जेवणाचे साहित्य फेकले जाते तसेच मडुरा रेल्वेस्टेशन परिसर आणि पाण्याच्या ओहोळात कोंबड्यांचे अवयव अज्ञातांकडून टाकले जातात परिणामी परिसरात मगरींना एक प्रकारचे आमंत्रणच देण्यासारखे आहे. प्रशासनाने अशा बेजबाबदार नागरिकांवर कारवाई करावी अशी मागणी प्रकाश वालावलकर यांनी केली आहे.
मडुरा हायस्कूलजवळ कचऱ्याचे साम्राज्य
