देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील तरवाडी पिरवाडी येथील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

*⚡देवगड ता.०७-:* देवगड जामसंडे नगर पंचायत हद्दीत तरवाडी पिरवाडी येथील सुमारे ७० हून अधिक कार्यकर्त्यांनी जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी मोठ्या संख्येने तरवाडी पिरवाडी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. शिवसेना तालुकाप्रमुख मिलिंद साटम, विलास साळसकर, रवींद्र जोगल आदी शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते. या प्रभागात अपेक्षित विकास झालेला नसून या नगरपंचायत प्रभागात संभाव्य उमेदवारी निश्चित करण्यात आली असताना त्यांना डावलून अन्य महिला उमेदवारी देण्यात आली .त्यामुळे नागरिकांत नाराजी निर्माण झाली. आहे. फोटो शिवसेनेत पक्ष प्रवेश प्रसंगी उपस्थित तरवाडी पिरवाडी ग्रामस्थ

You cannot copy content of this page