मालवण येथील सापळे मिठाई व फटाक्यांचे व्यापारी नितीन सापळे यांचे निधन…

मालवण, दि प्रतिनिधी मालवण सोमवार पेठेतील सापळे मिठाई व फटाक्यांचे व्यापारी नितीन रामचंद्र सापळे (वय-५३) यांचे काल मध्यरात्री राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. सदा हसतमुख, मनमिळाऊ स्वभावाचे ते ओळखले जात. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच व्यापाऱ्यांनी शोक व्यक्त केला. बाजारपेठेतील दुकाने बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आज सकाळी दांडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे आई, पत्नी, मुलगे, भाऊ, बहीण, भावजयी, पुतण्या, पुतना असा परिवार आहे. सोबत फोटो

You cannot copy content of this page