Headlines

तळाशील येथील मच्छीमारांना मत्स्य विभागामार्फत किसान क्रेडिट कार्ड चे मार्गदर्शन…

मालवण दि प्रतिनिधी तळाशील येथील मच्छीमारांना मत्स्य विभागामार्फत किसान क्रेडीट कार्ड योजनेविषयी माहिती देण्यात आली. मच्छीमारांना योजनेचा जास्तीत-जास्त लाभ घेण्याचे आवाहन मत्स्य विभागाकडून करण्यात आले. यावेळी सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी तेजस्विता करंगुटकर, परवाना अधिकारी मुरारी भालेकर, बँक प्रतिनिधी नीलेश पाटील, मंदार पाटील, मिलिंद तांबे, व्ही. बी. डोर्लेकर, सागर मित्र राजेंद्र पेडणेकर, काजल सावंत, सिद्धी खोत आदी उपस्थित होते. स्वागत गोपाळकृष्ण मंदिर समिती अध्यक्ष आनंद खडपकर यांनी केले. उपस्थित मच्छीमार आणि महिलांनी किसान क्रेडीट कार्ड योजना अधिक लाभार्थीभिमुख होण्यासाठी काही सूचना मांडल्या.

You cannot copy content of this page