मालवण दि प्रतिनिधी राज्यात तिसऱ्यांदा हापूस आंबा पेटी पुण्यात पाठविल्याबद्दल मालवण कुंभारमाठ येथील आंबा बागायतदार उत्तम फोंडेकर आणि आबा फोंडेकर यांचा मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून मालवण कुडाळ मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी उत्तम फोंडेकर आणि आबा फोंडेकर यांचा राज्यात तिसऱ्यांदा हापूस आंबा पेटी पुण्यात पाठविल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी हापूस आंबा च्या बाबतीत मालवण चे नाव उत्तम फोंडेकर यांनी जिल्ह्यात अग्रस्थानी आणले याचा आम्हाला अभिमान आहे असे सांगितले
हापूस आंब्याची तिसरी पेटी पुण्यात पाठविणाऱ्या उत्तम आणि आबा फोंडेकर यांचा आ. वैभव नाईक यांनी केला सत्कार
