रस्त्यालगत ठेवलेले भंगार साहित्य न हटविल्यास आंदोलन छेडणार

निसार शेखर यांचा इशारा; तहसीलदारांना दिले निवेदन

*⚡कणकवली ता.०७-:* कलमठ आचरारस्ता ते वरवडेकडे जाणार्‍या बांधकाम विभागाच्या मालकीच्या जागेमध्ये रस्त्यालगत मयाप्पा सुबराव इंगळे यांनी भंगाराचे सामान रस्त्यालगत ठेवले आहे. त्यामुळे हे भंगाराचे साहित्य वाहतुकीस अडथळा निर्माण झाले आहे. याशिवाय या भंगार साहित्याचा कलमठ ग्रामस्थांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. या भंगार व्यावसायिकाने रस्त्यालगतचे सामान लवकरात लवकर न उचलल्यास कलमठ ग्रामस्थांच्यावतीने आंदोलन छेडणार येईल, असा इशारा कलमठचे माजी सरपंच निसार शेख यांनी दिला आहे. याबाबत निवेदन त्यांनी तहसीलदार आर.जे.पवार यांना सादर केले. यावेळी अमजद शेख, सरफराज शेख, शहानवाज शहा, शकिल शेख, गुरुनाथ वर्देकर, इद्रुस शेख, मोअज्जम शेख, अनवर साठी, जुबेर शेख, संदिप मेस्त्री, विलास गुडेकर, नासिर शेख, सोहेल शेख उपस्थित होते.

You cannot copy content of this page