*⚡बांदा ता.०७-:* सावंतवाडी तालुक्यातील पाडलोस गावचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ माऊली पंचायतन देवस्थानचा वार्षिक जत्रौत्सव गुरुवार दि. 9 डिसेंबर रोजी साजरा होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे सर्व नियम भाविकांनी पाळून दर्शनाचा लाभ घेत सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी श्रींची पूजा त्यानंतर नवस बोलणे, नवस फेडणे तसेच ओटी भरणे आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. रात्रौ सवाद्य पालखी मिरवणूक होणार आहे. नंतर आजगावकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग सादर होणार आहेत. सामाजिक अंतर राखून तसेच नियमांचे पालन करून भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.
पाडलोस रवळनाथचा 9 रोजी जत्रोत्सव
