रेशन दुकानांवर साखर, तेल यांच्यासह इतर धान्याचा पुरवठा करा…

बांदा मंडल अध्यक्ष प्रविण देसाई यांची तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

*⚡सावंतवाडी ता.०७-:* कोरोना विषाणू संसर्गाांच्या पार्श्वभूमिवर अनेकांचे रोजगार बुडाले असून आर्थिक विवंचने मुळे कुटुंबाचे उदरनिर्वाह करणेसुध्दा जिकरीचे बनले आहे यामुळे शासन स्तरावर मिळणाऱ्या अन्नधान्याबरोबरच साखर, गोडे तेल, तुरडाळ व तत्सम कडधान्ये पुरवठा करण्यात यावा अशी मागणी भाजप किसान मोर्चा मंडल अध्यक्ष सांवतवाडी / बांदा प्रविण देसाई यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे.

निवेदनात असे म्हटले आहे की सिंधुदुर्ग जिल्हयातील बहुतांश कुटुंबे ही आजही रेशन दुकानावरील मिळणाऱ्या अन्नधान्यावर अवलंबून आहेत. कोरोना विषाणू संसर्गाांच्या पार्श्वभूमिवर अनेकांचे रोजगार बुडाले आहेत आर्थिक विवंचने मुळे कुटुंबाचे उदरनिर्वाह करणेसुध्दा जिकरीचे बनले आहे. अशा या परिस्थितीत शासन स्तरावर मिळणाऱ्या अन्नधान्याबरोबरच रेशन कार्डबर साखर, गोडे तेल, तुरडाळ व तत्सम कडधान्ये यासारख्या सुविधा मिळाव्यात

You cannot copy content of this page