महाविकास आघाडी कडून सन्मानजनक जागा न मिळाल्यास २० ही जागा लढवणार

तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी; सत्ताधाऱ्यांनी कमळ कुठे फुलते याचे आत्मपरीक्षण करावे…

*⚡सावंतवाडी ता.०७-:* आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची लढाई ही कोणत्या व्यक्तीविरोधात नसून, वैचारिक असणार आहे. यावेळी आपण २० ही नगरसेवकांची तयारी केली असून, महाविकास आघाडी मधून सन्मानजनक जागा न मिळाल्यास सर्व जागा लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी जर नगरपालिकेवर सत्ता आली तर अध्यक्ष शरद पवार यांच्या माध्यमातून बारामतीच्या धर्तीवर सावंतवाडी शहराचा विकास करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. हल्ली अनेक दिवस सोशल मीडियावर तळ्यात कमल फुलले अशा पोस्ट टाकण्यात येत आहेत. परंतु, त्यांनी प्रथम स्वतःचे आत्मपरीक्षण करावे. यापूर्वी शहराचे केंद्र बिंदू असणाऱ्या मोती तलावात कधीच अशी अस्वच्छता निर्माण झाली नव्हती. कमळ नक्की कुठे फुलते याचा सत्ताधाऱ्यांनी विचार करावा. असा हल्ला यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी चढवला आहे.

You cannot copy content of this page