पोलिसांच्या कारवाईचा परीक्षार्थी विद्यार्थ्यांना फटका

बाबू सावंत यांची मध्यस्थीनंतर कारवाई करून सोडले

*⚡सावंतवाडी ता.०७-: मोती तलाव येथे झालेल्या दुचाकी अपघातानंतर सावंतवाडी पोलिसांनी युवकांवर केलेल्या कारवाईचे सर्वांनी स्वागतच केले. परंतु परीक्षेसाठी आलेल्या काही अन्य विद्यार्थ्यांनाही या कारवाईचा नाहक त्रास सहन करावा लागला. याबाबत पंचायत समिती सदस्य बाबू सावंत यांच्याशी संपर्क साधून त्यांचे लक्ष वेधले असता सावंत यांनी सावंतवाडी पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांच्याशी संपर्क साधून परीक्षेला जाणाऱ्या युवकांवर कारवाई करून सोडून देण्यात यावे, अशी मागणी केली.

एसटी बंद असल्याने युवकांना दुचाकीशिवाय पर्याय नाही, याकडेही कोरे यांचे लक्ष वेधले. तसेच पालकांनीही आपल्या पाल्याला कॉलेजपर्यंत स्वतः सोडावे, असे आवाहनही बाबू सावंत यांनी सर्व पालकांना केले आहे.

You cannot copy content of this page