कॉलेज युवकांच्या धूमस्टाईलमुळे सावंतवाडीत अपघात

दोन दुचाकींच्या धडकेत तिघे गंभीर जखमी;दोघांना बांबोळी-गोवा येथे हलविले

*⚡सावंतवाडी ता.०७-:* येथील जगन्नाथराव भोसले उद्यानानजीक आज सकाळी दोन दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात दोन महाविद्यालयीन युवकांसह तिघेजण जखमी झाले. या तिघांवर येथील उपज़िल्हा रुग्णालयात उपचार करून गंभीर जखमी असलेल्या दोघांना बांबोळी-गोवा येथे हलविण्यात आले. हा अपघात सव्वादहाच्या सुमारास घडला.

शहरातील एका महाविद्यालयातील दोन युवक भरधाव वेगाने येत असताना समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात कॉलेज युवकांसह नेमळेतील युवक गंभीर जखमी झाला. गंगाराम राऊळ, सखाराम गवस आणि गणेश गावडे अशी जखमींची नावे आहेत. दरम्यान, हा अपघात कॉलेज युवकांच्या धूमस्टाईलमुळे झाला असून याचा नाहक फटका मात्र नेमळेतील युवकाला बसल्याची चर्चा आहे.

You cannot copy content of this page