मळेवाड येथील भजन स्पर्धेत वडखोल-गोवर्धन मंडळ विजेता

रुपेश राऊळ यांच्या हस्ते उदघाटन;द्वितीय क्रमांक रामकृष्ण हरी पाट, तर तृतीय निवजेश्वर मंडळ निवजे

*⚡सावंतवाडीता.०७-:* हिंदूह्रदयसम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त मळेवाड-कोंडूरे शिवसेना शाखेच्यावतीने मळेवाड जकातनाका येथे आयोजित निमंत्रित भजन स्पर्धेत वडखोल (वेंगुर्ला) येथील गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. द्वितीय क्रमांक रामकृष्ण हरी सेवासंघ, पाट (कुडाळ), तर तृतीय क्रमांक निवजेश्र्वर भजन मंडळ, निवजे (कुडाळ) यांनी मिळविला. या भजन स्पर्धेत एकूण सात संघांनी सहभाग घेतला. तत्पूर्वी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून भजन स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजन मुळीक, बाबल ठाकूर, योगेश नाईक, एकनाथ नारोजी, श्री. गावडे, ग्रामपंचायत सदस्य अर्जुन मुळीक, सानिका शेवडे, कविता शेगडे, मधुकर जाधव, परीक्षक सुनील पाडगावकर, मनीष तांबोस्कर यांच्यासह नम्रता झारापकर, प्रकाश पार्सेकर, रमाकांत नाईक आदी उपस्थित होते. या स्पर्धेत वैयक्तिकसाठी उत्कृष्ट गायक-रुपेंद्र परब (गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ, वडखोल), हार्मोनियम-समीर नाईक (स्वराभिषेक, मणेरी), पखवाज-राकेश पिंगुळकर (निवजेश्र्वर भजन मंडळ), तबला-सिद्धेश वेंगुर्लेकर (निवजेश्र्वर भजन मंडळ), झांज-संतोष धर्णे (श्री स्वामी समर्थ भजन मंडळ, कलंबिस्त) यांना गौरविण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक वितरण करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना बाळ शिरसाट यांनी, तर निवेदन राजा सामंत यांनी केले. यावेळी भजनप्रेमी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page