कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के;सावंतवाडी येथील पंचम खेमराज महाविद्यालयात केले मार्गदर्शन
*⚡सावंतवाडी ता.०६-:* नव्याने जाहीर झालेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील बहुशाखीय शिक्षण व्यवस्था विद्यार्थ्यांसाठी लाभदायी ठरणार आहे. हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यार्थी केंद्रीत व विद्यार्थी कौशल्य गुणांना सक्षम बनविणारे आहे, असे मत कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विषयावर कुलगुरू डॉ. शिर्के यांनी आज येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयात व्याख्यान दिले. तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी श्रीमंत खेमसावंत भोसले, संचालक जयराम सावंत, अँड. शामराव सावंत, प्राचार्य डॉ डी एल भारमल, प्रा गणेश मर्गज आदी उपस्थित होते. यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, प्रचलित शिक्षण व्यवस्थेमध्ये थोडेफार बदल करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे जाहीर झाले आहे. यात एका शाखेचे कॉलेज ही संकल्पना आता बंद होणार असून बहुशाखीय शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. या बहुशाखीय शिक्षणामुळे एका शाखेत शिक्षण घेत असताना दुसऱ्या शाखेचे शिक्षण विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे. तर दुसऱ्या शाखेतून आवडीचा विषय शिकण्याची मुभा देण्यात आली असून शिक्षण घेण्याची मर्यादा काढून टाकली आहे. त्यामुळे हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यार्थी केंद्रीत व विद्यार्थी कौशल्य गुणांना सक्षम बनविणारे आहे, असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० जाहीर झाले आहे आता राज्यांनी शैक्षणिक धोरण राबवायला सुरू करावेत असे आवाहन शासनाने केले आहे. त्यानुसार काही राज्यात हे धोरण समाविष्ट करण्यास सुरुवात केली आहे. आपल्या राज्यात डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. ही समिती राज्य सरकारला अहवाल सादर करेल आणि धोरण निश्चित होईल. तसेच महाविद्यालयाना पदवी देण्याचे अधिकार देखील उपलब्ध होतील. विद्यार्थी, शिक्षण, समाज यांच्यावर या धोरणाचा काय परिणाम होईल यावर चर्चा होणेदेखील आवश्यक आहे. शैक्षणिक धोरण हे विद्यार्थी केंद्रित आहे. विद्यार्थ्यांना मुख्य केंद्रस्थानी ठेवून हे धोरण बनवले असून त्यांना हवे तसे शिक्षण घ्यायची मुभा राहिल, असे डॉ दिगंबर शिर्के यांनी सांगितले.
आताच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये काही थोडे फार बदल करणे आवश्यक आहे त्यानुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 जाहीर झाले आहे त्यात बदल कसे असतील ते व्यख्यानाच्या माध्यमातून सगळीकडे पोहोचवायचे आहेत या धोरणात एक शाखेचे कॉलेज ही संकल्पना बंद होणार आहे. यामुळे बहुशाखीय शिक्षण विद्यार्त्यांना मिळणार आहे एका महाविद्यालयात प्रवेश घेतला असता तर परदेशातील नामांकित विद्यापीठाचा कोर्स घेण्याची तसेच अन्य महाविद्यालयात आपल्या आवडत्या विषयाचे शिक्षण कोर्सेस घेण्याची मुभा असणार आहे.
यु जी सी ने पारित केल्यास महाविद्यालयांना डिग्री देण्याचे स्टेटस प्राप्त होतील. शिक्षकांनी या धोरणाविषयी तत्परतेने तयार राहावे. नवीन धोरण जे चांगले शिक्षण देऊन विद्यार्थ्यांना सक्षम बनवणार आहे. स्किल एज्युकेशनने काही कौशल्य आत्मसात करण्याची संधी विद्यार्त्याना मिळणार आहे बेरोजगारी दूर करण्यासाठी कौशल्य गुणांना वाव देणारे शिक्षण उपलब्ध होणार आहे असा विश्वास डॉ दिगंबर शिर्के यांनी व्यक्त केला.
