महापरिनिर्वाण दिनानिमित्त आंबेडकर यांना अभिवादन

आ नितेश राणे यांची उपस्थिती;भाजपाचे पदाधिकारी होते उपस्थित

वैभववाडी प्रतिनिधी कायदेतज्ञ, क्रांतिसूर्य, घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वैभववाडी येथील बुद्ध विहारात आमदार नितेश राणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी, चित्रपट कामगार आघाडी जिल्हा उपाध्यक्ष रितेश सुतार, वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघाचे सरचिटणीस रवींद्र पवार व पदाधिकारी उपस्थित होते. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन येथे तालुका बौध्द सेवा संघाच्या वतीने महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. यावेळी बौद्ध बांधवांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. फोटो – वैभववाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करताना आमदार नितेश राणे. यावेळी उपस्थित भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी, रितेश सुतार, रवींद्र पवार व इतर.

You cannot copy content of this page