देवगडमध्ये ३१ उमेदवारी अर्ज दाखल

उद्या शेवटचा दिवस

देवगड-प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हयाच्या राजकीय पटलावरती महत्वाची समजली जाणा-या देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सोमवारी 31 उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत. प्रभाग निहाय नामनिर्देशन दाखल केलेले उमेदवार प्रभाग क्रमांक-1 स्वरा सुशिल कावले, प्रभाग क्रमांक 2 – धिरज गोविंद बाणे,तेजस दत्तात्रय मामघाडी,सुधीर लवु तांबे प्रभाग क्रमांक 3 – अश्विनी अरविंद कावले,कल्पना गुरुनाथ पाटकर प्रभाग क्रमांक4 –सुजाता उमेश कुलकर्णी प्रभाग क्रमांक 5 – राजेंद्र श्रीधर वालकर, उमेश वासुदेव कुळकर्णी प्रभाग क्रमांक 6 – तन्वी योगेश चांदोस्कर, निधी निनाद देशपांडे प्रभाग क्रमांक 7 – तुषार तुकाराम भाबल, रोहन विश्वनाथ खेडेकर प्रभाग क्रमांक 8 – शुभा शैलेश सारंग प्रभाग क्रमांक 9 – सुरेश सदानंद कदम प्रभाग क्रमांक 10 – मिताली राजेश सावंत प्रभाग क्रमांक 11 – मनोज दत्तात्रय पारकर प्रभाग क्रमांक 12 – तुषार विजय पेडणेकर,परिमल प्रमोद नलावडे,ज्ञानेश्वर सुर्यकांत खवळे प्रभाग क्रमांक 13- उमेश भास्कर कणेरकर,उमेश धनंजय गोळवणकर,विशाल विकास मांजरेकर प्रभाग क्रमांक 14- हर्षा उमेश ठाकुर,अरुणा योगेश पाटकर प्रभाग क्रमांक 15 –श्रध्दा बापू आंबेरकर,आदया उमेश गुमास्ते प्रभाग क्रमांक 16 – शरद रामचंद्र ठुकरुल,एकांत विलास गोळम प्रभाग क्रमांक 17- साक्षी गजानन प्रभू,प्रांजली जयप्रकाश प्रभू या उमदेवारांनी उमेदवारी नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत. भाजपाच्या उमेदवारांनी देवगड मांजरेकर नाका ते देवगड तहसिलदार अशी ढोल ताशांच्या गजरात रॅली काढुन उमदवारी अर्ज दाखल केले आहेत. सोमवारी सकाळ पासुनच देवगड तहसिलदार कार्यालयामध्ये उमेदवारी अर्ज् दाखल करण्यासाठी तर काहि उमेदवारांनी आपल्या कागद पत्रांची पुर्तता करण्यासाठी देवगड तहसिलदार कार्यालयामध्ये गर्दी केली होती. फोटो- भाजपाच्या प्रभाग क्रमांक 6 मधील उमेदवार तन्वी चांदोस्कर उमेदवारी अर्ज दाखल करताना छाया-वैभव केळकर

You cannot copy content of this page