भाजपची नवीनांना संधी

यादी करण्यात आली प्रसिद्ध;उद्या उमेदवारी भरण्याची शेवटची मुदत

वैभववाडी प्रतिनिधी वाभवे – वैभववाडी नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूकीसाठी भाजपाच्या वतीने अधिकृत उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीत भाजपाने नवीन उमेदवारांना संधी दिली आहे.

प्रभागनिहाय उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे – प्रभाग क्र. 1 – स्नेहलता सदाशिव चोरगे, प्रभाग क्र. 2 – नेहा दीपक माईणकर, प्रभाग क्र. 3 – रेवा रामचंद्र बावदाणे, प्रभाग क्र. 4 प्रिया भानुदास तावडे, प्रभाग क्र. 5 – संगीता बजरंग चव्हाण, प्रभाग क्र. 6 – राजन वसंत तांबे, प्रभाग क्र. 7 – भालचंद्र मारुती रावराणे, प्रभाग क्र. 9 – सुप्रिया राजन तांबे, प्रभाग क्र. 10 – सुंदरी रामचंद्र निकम, प्रभाग क्र. 11- यामिनी यशवंत वळवी, प्रभाग क्र. 12 – विवेक सज्जन रावराणे, प्रभाग क्र. 13 – संजय दिगंबर सावंत, प्रभाग क्र. 14 – श्रावणी श्रीकांत तांबे, प्रभाग क्र. 15 – नारायण शांताराम मांजरेकर, प्रभाग क्र.16 – स्नेहल तेजस आंबेकर, प्रभाग क्र. 17 – सानिका समाधान रावराणे उमेदवारांना भाजपाने संधी दिली आहे. निवडणूक लढविणा-या उमेदवारांची यादी वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी यांनी प्रसिद्धी पत्रकातून जाहीर केली आहे. वाभवे – वैभववाडी नगरपंचायतीच्या 17 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. भाजपाने 16 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. प्रभाग क्रमांक 8 मध्ये भाजपाने अधिकृत उमेदवार जाहीर केला नाही.

You cannot copy content of this page