भाजयुमो मालवण शहराध्यक्षपदी ललित चव्हाण

प्रदेश सरचिटणीस निलेश राणे यांनी दिले नियुक्तीपत्र

मालवण दि प्रतिनिधी भारतीय जनता युवा मोर्चाच्या मालवण शहराध्यक्षपदी रेवतळे मालवण येथील ललित हरी चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.याबाबतचे नियुक्ती पत्र भाजपाचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते देत श्री ललित चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला भाजपचे युवा कार्यकर्ते म्हणून काम करणाऱ्या ललित चव्हाण हे भारतीय मजदूर संघाचे जिल्हा सरचिटणीस हरी चव्हाण यांचे सुपूत्र आहेत. श्री ललित चव्हाण हे उत्कृष्ट कबड्डीपटू असून दांडगा मित्रपरिवार आहे. यावेळी निलेश राणे यांनी चव्हाण यांच्या वाटचालीला शुभेच्छा दिल्या. आगामी नगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने तरूणांचे सैन्य तयार करण्यासाठी ललित चव्हाण यांनी कामास लागावे, त्यांना पक्षाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही निलेश राणेंनी दिली. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे. या निवडीवेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, प्रभारी शहर मंडल अध्यक्ष विजय केनवडेकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, नगरसेवक दीपक पाटकर, गणेश कुशे, बाबा परब, सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, आबा हडकर यांच्यासह शहरातील अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page