खासदार विनायक राऊत यांनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट

कोकणरेल्वेच्या खासगीकरणाबाबत केली चर्चा;खासगीकरण झाल्यास आंदोलनाचा दिला इशारा

*⚡कुडाळ,ता.०६-:* कोकण रेल्वेच्या खासगीकरणाच्या पार्श्वभूमीवर खासदार विनायक राऊत यांनी आज केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांची दिल्ली येथील संसद भवनात भेट घेवून चर्चा केली. यावेळी राऊत यांनी येथील परिस्थिती कथन करताना रेल्वे ही कोकणाचे प्रतिक आहे. त्यामुळे खासगीकरण होवू नये, अशी मागणी केली. खासगीकरण झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी रेल्वेमंत्र्यांना दिला. याबाबत खासदार राऊत यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोकण रेल्वे ही सिंंधुदूर्ग-रत्नागिरी,रायगड-ठाणे येथिल सर्वसामान्य लोकांना फायद्याची ठरत आहे. तसेच वाहतूक दळणवळणासाठी तो महत्वाचा दुवा ठरला आहे. त्यामुळे कोकण रेल्वेचे खासगीकरण झाल्यास त्याचा मोठा फटका येथिल जनतेला सहन करावा लागणार आहे. त्यामुळे याबाबत योग्य तो सकारात्मक निर्णय घ्यावा अन्यथा आम्ही आंदोलन करू असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.

You cannot copy content of this page