शिवाजी परब यांनी सादर केला अर्ज;नगराध्यक्ष संजू परब यांची उपस्थिती
*⚡सावंतवाडी ता.०६-:* तालुक्यातील आंबेगाव गावचे माजी उपसरपंच वासुदेव परब यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणूकीत भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून शिवाजी उर्फ संजू परब यांनी सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांच्या प्रमुख उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज आज सादर केला.
यावेळी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, ज्ञानेश्वर परब, बूथ कमिटी अध्यक्ष संतोष राणे, शक्ती केंद्र प्रमुख योगेश गवळी, ग्रामपंचायत सदस्य तुकाराम राऊळ, रामचंद्र परब सखाराम कुंभार,अशोक केळुसकर,सचिन परब,अजय परब,नितीन केळुसकर, एकनाथ शेळके, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.भाजप जिल्हा चिटणीस महेश सारंग व नगराध्यक्ष संजू परब यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवली जाणार आहे. शिवाजी उर्फ संजू परब यांच्याकडे आंबेगावचे भावी नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे. ते कै. वासुदेव परब यांचे पुतणे असून माजी सरपंच पांडुरंग परब यांचे पुत्र आहेत.
पांडुरंग परब यांनी आंबेगावचे सरपंच पद भूषवले होते तर कै. वासुदेव परब हे देखील १५ वर्षे सरपंच व उपसरपंच राहिले होते. त्यामूळे त्यांचा राजकीय वारसा चालविण्याचे काम शिवाजी परब नक्कीच करतील असा विश्वास आंबेगाववासीयांनी आहे. दरम्यान, या पोटनिवडणूकीत भाजप पुरस्कृत उमेदवार शिवाजी उर्फ संजू परब यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास नगराध्यक्ष संजू परब यांनी व्यक्त केला आहे.
