*⚡कणकवली ता.०६-:* महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कणकवली तालुका व शहर राष्ट्रवादीच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला राष्ट्रवादी नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आले.
यावेळी कणकवली तालुका बौद्ध विकास संघ शाखा अध्यक्ष डी. डी. कदम, खजिनदार संजय कदम, शैलेश तांबे, राष्ट्रवादीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, राष्ट्रवादी माजी तालुका अध्यक्ष विलास गांवकर, शहर अध्यक्ष इमरान शैख़. सरचिटणीस अनीस नाईक, शहर उपाध्यक्ष अमित केतकर, माजी राष्ट्रवादी ग्राहक स्वरक्षण जिल्हा अध्यक्ष दिलीप वर्णे, राष्ट्रवादी माजी युवक शहर अध्यक्ष निशिकांत कडुलकर माजी युवक तालुकाअध्यक्ष सागर पवार, गणेश चौगुले विशाल ठानेकर, सचिन सदडेकर, माजी उपसरपंच सतीश पाताडे, विशाल पेड़नेकर, हूबरट उपसरपंच मुश्ताक काझी, उदय सावंत, धनंजय पाताडे, राजू वरदम, जाहिर फ़क़ीर, सचिन अडुलकर आदि उपस्थित होते

