मनाई आदेशामुळे जेलभरो आंदोलन स्थगित…

संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांची माहिती

*⚡सावंतवाडी ता.०६-:* एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला पाठींबा देण्यासाठी पुकारण्यात आलेले जेल भरो आंदोलन जिल्हाधिकारी यांनी १६ डिसेंबर पर्यंत लावलेल्या मनाई आदेशामुळे तात्पुरते स्थगित करण्यात येत असल्याची माहिती विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांनी दिली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाची मागणी अद्यापही शासनाने मान्य न केल्याने एसटी कर्मचाऱ्यांचा संप एक महिना होऊनही मिटला नाही एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त असून याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवार 7 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता बस स्थानक येथे एसटी जेलभरो आंदोलन पुकारण्यात आले होते. सदरचे आंदोलन एसटी बंद असल्याने प्रवासी विद्यार्थी फिरते व्यापारी दुकानदार आठवडा बाजार या वर झालेल्या परिणाम यासाठी पुकारण्यात आले होते. परंतु जिल्हाधिकारी यांनी मनाई आदेश लावल्याने आणि सावंतवाडी पोलिसांकडून केलेल्या विनंतीनुसार हे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आले आहे मात्र वस्तुस्थिती लक्षात घेऊन एसटी कर्मचाऱ्यांना नियमित पगारवाढ देण्याबाबत कार्यवाही व्हावी अन्यथा 16 डिसेंबर रोजी मनाई आदेश सुटल्यानंतर शासनाला जाग येण्यासाठी शांततेत मोर्चा काढावा लागेल असा इशाराही तळवणेकर यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page