व्हॉलिबॉल निवड चाचणी ९ डिसेंबर रोजी

*⚡वेंगुर्ला ता.०६-:* सिंधुदुर्ग जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनच्यावतीने जिल्हा ज्यू गट (१८ वर्षांखालील मुले मुली) निवड चाचणी (१/१/२००३ नंतर ची जन्मतारीख) ९ डिसेंबरला बॅ. खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला येथे आयोजित केली आहे. तरी प्रत्येक तालुक्याने यापूर्वी आपल्या तालुक्याची निवड चाचणी घेऊन जिल्हा निवड चाचणीला संघ आणायचे आहेत. तसेच सर्व खेळाडूंनी सोबत आधार कार्ड आणावे असे आवाहन जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष विलास गावडे व जिल्हा सेक्रेटरी निलेश चमणकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी राधाकृष्ण पेडणेकर ९४२०२६२१९२, सॅमसन फर्नांडिस ९३०७३८६६५१, हेमंत गावडे ९४२१२३५१२८ यांच्याशी संफ साधावा.

You cannot copy content of this page