*⚡वेंगुर्ला ता.०६-:* खानली-सुरंगपाणी येथील श्री विठ्ठल पंचायतन देवस्थान येथे दत्तजयंती उत्सवानिमित्त भाविकांची आध्यात्मिक प्रगती होऊन समाधान प्राप्त होण्यासाठी दि. १० ते १९ डिसेंबर या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत दत्तनामस्मरण तसेच अन्य विविध धार्मिक, भजन व नाटक अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि.१० रोजी सायं.७ वा. रवळनाथ प्रासादिक तेंडोली यांचे भजन, दि.११ रोजी सायं.७ वा. ब्राह्मण प्रासादिक भेंडमळा यांचे भजन, दि.१२ रोजी सायं.७ वा. बाराचा पूर्वस धोंडवाडी-वायंगणी यांचे भजन, दि.१३ रोजी सायं.७ वा. गवळदेव मंडळ सुरंगपाणी यांचे भजन, दि.१४ रोजी सायं. ७ वा. महाविष्णू मंडळ आवेरा यांचे भजन, दि.१५ रोजी सायं.७ वा. सातेरी मंडळ सुरंगपाणी यांचे भजन, दि.१६ रोजी सायं. ७ वा. भोम मंडळ जुविवाडी-आंदुर्ले यांचे भजन, दि.१७ रोजी सायं. ६ वा. ब्राह्मण मंडळ आडेली यांचे भजन, सायं.७.३० वा. गौतमेश्वर दशावतार नाट्यमंडळाचे नाटक, खास आकर्षण भाविका खानोलकर हिचे पखवाज वादन, दि.१८ रोजी सकाळी श्रींची पाद्यपूजा, दुपारी आरती, महाप्रसाद, सायं. ६ वा. श्रींच्या जन्मसमयी पुष्पवृष्टी, पालखी प्रदक्षिणा, भिक्षादान, सायं. ७ वा. कै.बाबी कलिगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळाचे नाटक, दि.१९ रोजी सकाळी श्रींची पाद्यपूजा, दुपारी आरती, महाप्रसाद, सायं. ६ वा.सद्गुरु मंडळ कुडाळ यांचे भजन, सायं. ७ वा. ओंकार दशावतार नाट्य मंडळ म्हापण यांचे नाटक होणार आहे. या सर्व कार्यक्रमांना भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन विठ्ठल पंचायतनचे व्यवस्थापक प.पू.दादा पंडित यांनी केले आहे.
दत्तजयंती निमित्त सुरंगपाणी येथे विविध कार्यक्रम
