ज़िल्हा बँकेच्या सुरक्षिततेसाठी महाआघाडीच्या पाठीशी रहा

दीपक केसरकर यांचे आवाहन;वैभववाडी विकासात मागे पडत असल्याची केली टीका

वैभववाडी प्रतिनिधी जिल्हा बॕक ही राज्यातील नंबर एकची बॕक आहे.या बॕकेत सर्वसामान्य शेतकरी पैसे आहेत ही जिल्हा बॕक सुरक्षित राहीली पाहीजे.यासाठी सर्व मतदारांनी महाविकास आघाडीच्या पॕनलच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे.असे आवाहन माजी पालकमंञी दीपक केसरकर यांनी केले आहे.

वैभववाडी शिवसेना कार्यालयात आयोजित पञकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी शिवसेना नेते अतुल रावराणे संदेश पारकर,जिल्हा बॕंकेचे उमेदवार दिगंबर पाटील, तालुकाप्रमुख मंगेश लोके, स्वप्निल धुरी, प्रदीप रावराणे, संभाजी रावराणे आदी आदी.उपस्थितीत होते.

यावेळी बोलताना केसरकर पुढे म्हणाले अध्यक्ष सतीश सावंत यांनी कोणाच्याही दडपणाला बळी न पडता शेतकऱ्यांच्या हीताचे निर्णय घेतले.निवडणूकीच्या तोंडावर मोठमोठी थकबाकी भरली जाते.तेव्हा भविष्यात बॕंक बुडण्याची भिती असते.स्वतःच्या स्वार्थासाठी मोठमोठी कर्ज घेणारे बॕंक चालविण्यासाठी योग्य नाहीत.जिल्हा बॕंकेचे माजी अध्यक्ष शिवराम भाऊ जाधव यांनी जिल्हा बॕंकेचेच नव्हे तर शिखर बॕंकेचेही नेतृत्व केले.त्यांच्या सारख्या निस्वार्थी लोकांमुळेच आज जिल्हा बॕंक राज्यात नंबर वन आहे. सतीश सावंतांबरोबर असलेले सर्व उमेदवार हे प्रामाणिक आहेत.अशी माणसं असली तरच सोसायट्या व डे-या सुरक्षित राहातील.पालकमंञी उदय सामंत, गृहराज्यमंञी सतेज पाटील, व उपमुख्यमंञी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही जिल्हा बॕंक निवडणूक होत आहे.बॕंक गिळंकृत करणाऱ्यांना बॕंके पासून दूर ठेवले पाहीजे असेही केसरकर म्हणाले.

You cannot copy content of this page