दीपक केसरकर यांची ग्वाही;विकासासाठी महाआघाडीला संधी देण्याचे आवाहन
वैभववाडी प्रतिनिधी-: वैभववाडी शहराला नावाप्रमाणे वैभवशाली बनविण्यासाठी शहरातील नागरीकांनी एकदा महाविकास आघाडीला संधी दयावी.शहराच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी आमची राहील.असे आवाहन माजी पालकमंञी आमदार दीपक केसरकर यांनी केले आहे.
वैभववाडी येथील शिवसेना कार्यालयात आयोजित पञकार परिषदेत आ केसरकर बोलत होते.यावेळी शिवसेना नेते अतुल रावराणे, संदेश पारकर, सुशांत नाईक, दिगंबर पाटील,मंगेश लोके, प्रदीप रावराणे, संभाजी रावराणे, स्वप्निल धुरी, संजय चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना केसरकर पुढे म्हणाले, नगरपंचायतीला निधी हा जिल्हा नियोजन मंडळातून येतो.राज्याच्या नगरोत्थानमधून येतो तो केंद्र सरकारमधून येत नाही.असा टोला लगावत याचे फुकाचे श्रेय कोणी घेऊ नये.जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला.परंतु तो योग्य पध्दतीने खर्च होऊ शकला नाही.यापुढेही जिल्ह्यातील नगरपंचायतीना मोठ्याप्रमाणात निधी देण्याची जबाबदारी आमची राहील.
जिल्ह्यात हट्टाने सत्ता राबविली जाते.आपली बांधीलकी ही जनतेशी आहे.लोकप्रतिनिधी हे जागृत हवेत.याचा अभाव असल्यामुळे देवगड, वैभववाडी विकासात मागे पडत असल्याची टीका केसरकर यांनी केली. वैभववाडी येथे अनेक पर्यटन स्थळे आहेत.त्यांचा विकास होणे आवश्यक आहे.येथे ऊस उत्पादन होते.त्याला पुरक व्यवसाय उभे करण्याची गरज आहे.असे उद्योगधंदे निर्माण करुन येथील तरुणांच्या हाताला काम देता येईल.यासाठी विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविणे आवश्यक आहे.
