सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्याक विभाग प्रदेश उपाध्यक्ष तथा सिंधुदुर्ग जिल्हा निरिक्षक हुजुर इनामदार, प्रदेश सचिव सलीम मुजावर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ अध्यक्षा अर्चना घारे-परब यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. अर्चना घारे-परब यांनी कालच सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी दोन मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अल्पसंख्याक विभागाकडून या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. यावेळी राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष रेवती राणे, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, हिदायतुल्ला खान, दर्शना बाबर-देसाई, सावली पाटकर, प्रसाद दळवी आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी प्रदेश कडून जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी अर्चना घारे – परब यांना शुभेच्छा
