मंत्र्यांच्या आदेशाला न जुमानता काम सुरू

ग्रामस्थांनी वेधले खासदार, आमदारांचे लक्ष

*⚡बांदा ता.०४-:* दोडामार्ग तालुक्यातील आडाळी येथे कडशी नदीवर बांधण्यात येणाऱ्या बंधाऱ्याचे काम डिंगणे, डोंगरपाल ग्रामस्थांनी आक्षेप घेतल्याने राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी तात्काळ थांबविण्याच्या सूचना दोन दिवसांपूर्वी दिल्या होत्या. मात्र मंत्र्यांच्या आदेशाला न जुमानता काम सुरू असल्याचा आरोप डिंगणे ग्रामस्थांनी केला आहे. यासंदर्भात डिंगणे, डोंगरपाल ग्रामस्थांनी खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर यांची बांदा येथे भेट घेत लक्ष वेधले आहे. यावेळी आपण प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करण्याचे आश्वासन देत काम सुरू असल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन खासदार राऊत यांनी दिले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, युवा नेते संदेश पारकर, डिंगणे सरपंच संजय डिंगणेकर, उपसरपंच जयेश सावंत, विलास सावंत, माजी सरपंच लाडू गवस, पोलीस पाटील यशवंत सावंत, महादेव सावंत, निलेश सावंत, समीर सावंत, बंटी गवस, विनोद सावंत यांच्यासह शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, उपतालुकप्रमुख भैया गोवेकर, संजय आईर, गिरीश नाटेकर, डिंगणे डोंगरपाल ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page