राष्ट्रवादी अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष हुजुर इनामदार यांचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी केले स्वागत

सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्याक विभाग प्रदेश उपाध्यक्ष तथा सिंधुदुर्ग जिल्हा निरिक्षक हुजुर इनामदार, प्रदेश सचिव सलीम मुजावर यांनी सावंतवाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आगामी नगरषरिदेच्या निवडणुकीचा पार्श्वभूमीवर प्रदेशवरून होणाऱ्या भेटीगाठी महत्वपूर्ण मानल्या जात आहेत. यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, हिदायतुल्ला खान, शफिक खान, दर्शना बाबर-देसाई, इफ्तिकार राजगुरू, आसिफ ख्वाजा, संतोष जोईल, जावेद शेख, सावली पाटकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page