नगरपंचायत निवडणुकीसाठी अद्याप एकही अर्ज दाखल नाही…

निवडणूक निर्णय अधिकारी उपेंद्र तामोरे यांची माहिती

देवगड देवगड जामसंडे नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२१ करीता १७ प्रभाग असून दि ३ डिसेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही.शनिवार रविवार सुट्टीचे दिवस असल्याने या दिवशी नामनिर्देशन पत्र स्वीकारली जाणार नाहीत.दि ६ व ७ डिसेंबर २०२१ रोजी स.११ते ३ या वेळात नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार असून अनामत रक्कम सर्वसाधारण गटाकरिता रु १०००/- व आरक्षित जागेकरिता रु ५००/- एवढे स्वीकारले जाणार आहे.अशी माहिती देवगड जा मसंडे नगरपंचायत निवडणूक निर्णय अधिकारी उपेंद्र तामोरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली .या वेळी सहा. निवडणूक निर्णय अधिकारी कौस्तुभ गव्हाणे उपस्थित होते. या पुढे बोलताना ते म्हणाले एक उमेदवार एकापेक्षा अधिक अर्ज अन्य प्रभागात दाखल करू शकतो.तसेच उमेदवारी अर्ज दाखल करताना ज्या उमेदवारांना राजकीय पक्षांकडून एबीफॉर्म दिला जाईल त्यांना त्याच प्रभागातील एक सूचक चालेल.परंतु अन्य अपक्ष उमेदवार निवडणूक लढवीत असतील तर त्यांना ५ सूचक आवश्यक आहेत.नामनिर्देशन पत्र व शपथपत्र ऑनलाइन भरणे आवश्यक आहे.राखीव जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने जात वैधता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे .असे आदेश आज प्रयाण कायम असून अद्याप नवीन निर्णय प्राप्त झालेले नाहीत .असेही आवर्जून नमुद केले.दि.८ डिसेंबर पर्यंत सकाळी ११ते ३ या वेळात अर्जाची छाननी करण्यात येणार आहे.१३ तारीखला अर्ज मागे घेण्याचा दिवस असून त्यानंतर अंतिम उमेदवार यादी व चिन्ह वाटप करण्यात येणार आहे.मतदान २१ डिसेंबर रोजी स.७.३० ते साय.५.३० या वेळात होणार असून मतमोजणी २२ डिसेंबर रोजी होणार आहे.असे सांगितले.

You cannot copy content of this page