श्री देव घोडेमुखाचा ८ रोजी वार्षिक जत्रोत्सव

*⚡सावंतवाडी ता.०३-:* ‘कोंब्याची जत्रा’ म्हणून राज्यभरात प्रसिद्ध असलेला पेंडुर (ता. वेंगुर्ला) येथील श्री देव घोडेमुखाचा वार्षिक जत्रोत्सव ८ डिसेंबर रोजी होत आहे. श्री देव घोडेमुख हे जागृत देवस्थान म्हणूनही प्रसिद्ध आहे. सावंतवाडी – रेडी मार्गावर पेंडुर गावातील उंच डोंगरमाथ्यावर निसर्गरम्य परिसरात घोडेमुख देवालय वसले आहे. मंदिरात जाण्यासाठी अतिशय बिकट आणि तीव्र चढावाचा मार्ग पार करावा लागतो. असे असले तरी हजारो भाविक हा मार्ग पार करून ‘श्रीं’चे दर्शन घेतात. आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी देवाला कोंब्याचा नवस बोलला जातो आणि जत्रोत्सवादिवशी तो फेडला जातो. शेकडो वर्षांची ही परंपरा आजही तेवढ्याच भक्तिभावाने पाळली जाते. राज्यभरातून हजारो भाविक जत्रोत्सवाला उपस्थित राहून श्री देव घोडेमुख चरणी नतमस्त्तक होतात.

You cannot copy content of this page