म्युनिसिपल नोकर सहकारी पतपेढीच्या अध्यक्षपदी दिपक म्हापसेकर यांची बिनविरोध निवड…

तर उपाध्यक्षपदी संजय पोईपकर यांची बिनविरोध निवड…

सावंतवाडी-: सावंतवाडी म्युनिसिपल नोकर सहकारी पतपेढी लि. ची पंचवार्षिक निवडणूक आज येथील बॅरिस्टर नाथ पै हॉल मध्ये बिनविरोध पार पडली. या निवडणुकीत दिपक म्हापसेकर यांची अध्यक्ष तर संजय पोईपकर यांची उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ही निवड २०२१-२२ ते २०२६-२७ या सालाकरिता करण्यात आली आहे. यावेळी संस्थेचे संचालक सुनील कुडतरकर, सचिव शंकर सावंत उपस्थित होते. तर यावेळी संस्थेचे सदस्य म्हणून प्रविण कांबळे, नागेश बिद्रे, अब्दुल शेख, देविदास आडारकर, भरत लाखे, विजय कोटेकर, मीनाक्षी पवार, आसावरी केळबाईकर, मनोज शिरोडकर आदींची निवड करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page