मालवणात पर्यटकाचे हृदयविकाराने निधन

*⚡मालवण ता.०३-:* मालवण येथे पर्यटनासाठी आलेल्या सातारा येथील रामचंद्र वसंत राऊत (वय ४८) या पर्यटकाचा शुक्रवारी पहाटे मृत्यू झाला. याबाबतची खबर राहुल राऊत यांनी मालवण पोलीस स्थानकात दिली. याप्रकरणी आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. सातारा येथील रामचंद्र वसंत राऊत हे आपल्या पत्नी आणि कुटुंबियांसंमवेत मालवण येथे पर्यटनासाठी आले होते. देवबाग येथील विघ्नेश निवास येथे वास्तव्यास होते. आज सकाळी त्यांच्या छातीत दुखू लागल्याने मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

You cannot copy content of this page