*मालवण ता.०३-:* युवासेना मालवण शहर प्रमुख मंदार ओरसकर यांच्या वतीने मालवण शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये मुलांना शैक्षणिक साहित्य, मास्क व खाऊ वाटप करण्यात आले. कोरोना कालावधीनंतर शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुलांना वह्या, दप्तर, पेन, आदी शैक्षणिक साहित्य तसेच मास्क व खाऊ वाटप मंदार ओरसकर यांनी केले. रेवतळे प्राथमिक शाळा, धुरीवाडा प्राथमिक शाळा, देऊळवाडा प्राथमिक शाळा, दांडी प्राथमिक शाळा, रोझरी प्राथमिक शाळा आणि तालुका स्कुल मालवण येथे हे साहित्य वाटप करण्यात आले. याबात शाळेच्या वतीने मुख्याध्यापक व शिक्षकांनी आभार मानले आहेत. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, बांधकाम सभापती मंदार केणी, नगरसेविका सेजल परब, उमेश मांजरेकर, भाई कासवकर, अमेय देसाई, किसन मांजरेकर, रेवतळे शिवसेना शाखा प्रमुख सिद्धेश मांजरेकर, विघ्नेश मांजरेकर, अविनाश मांजरेकर, नितीन हडकर, शुभम लुडबे, राजा मांजरेकर, अस्मित चव्हाण, सचिन कांबळी, बाबा नामनाईक, यासह शाळा मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.
युवासेना मालवण शहरप्रमुख मंदार ओरसकर यांच्याकडून शैक्षणिक साहित्य वाटप
