*⚡सावंतवाडी ता.०३-:* वेत्ये येथील जागृत श्री देव कलेश्वर देवाचा वार्षिक जत्रोत्सव ५ डिसेंबर रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त मंदिरात सकाळी विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. सायंकाळी कलेश्वर देवाला केळी, नारळ ठेवणे, नवस बोलणे-फेडणे, पूर्वी देवीची ओटी भरून नवसफेड करणे आदी कार्यक्रम होणार आहेत. रात्री पालखी मिरवणुकीनंतर जय हनुमान दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी जत्रोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान कमिटीने केले आहे.
वेत्ये येथील कलेश्वर देवाचा ५ रोजी जत्रोत्सव
