एसटी विभागीय कार्यशाळेबाहेर भाजपचे उपोषण
कणकवली ता.०१-:* कार्यालयीन वेळेत पक्षीय आंदोलनात सहभागी होत असल्याप्रकरणी यापूर्वी लक्ष वेधून देखील कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून शिवसेनेचे पदाधिकारी गितेश कडू यांच्या विरोधात एसटी विभागीय कार्यशाळेसमोर गुरुवारी सकाळपासूनच लाक्षणिक उपोषण सुरु करण्यात आले आहे.
या उपोषणात भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, पंचायत समिती सदस्य महेश लाड, सचिन परधीये, अण्णा कोदे, संदीप मेस्त्री, नितीन पाडावे, गणेश तळगावकर, राजू पेडणेकर, संतोष पुजारे, विजय चिंदरकर, समीर प्रभुगावकर, सुभाष मालंडकर, सागर राणे, प्रवीण दळवी,मिलींद लाड, भाई सावंत, सचिन खेडेकर, राजा डीचोलकर, शशी राणे, महेंद्र कुडाळकर आदी उपस्थित होते.
